शुद्ध बीजापोटी !

आजकाल आपल्याला प्रत्येक पालकांकडून असा सुरु ऐकायला मिळतो कि, माझा मुलगा / मुलगी माझे ऐकत नाही, तो / ती सतत मोबाइलवर टाइमपास करत असतात. वेळेत अभ्यास करत नाहीत. सकाळी लवकर उठत नाही, उद्धटपणे उत्तर देतात. आई - वडील कित्येक वेळा मुलांच्या हातातून मोबाईल हिसकावून घेतात, पण थोड्यावेळाने मुलं आई वडिलांची नजर चुकवून परत मोबाईल हातात घेतात. बऱ्याच आई - वडिलांसमोर मुले सतत टीव्ही, कॉम्पुटर, किंवा मोबाइलवर व्यस्त असतात ही खूप मोठी समस्या आहे. त्यांनी कित्येक वेळा रागावून, समजून सांगूनही आपलंच मुलं आपलं ऐकत नाहीत याच त्यांना दुःख असत. मी सांगितलेलं माझ्या मुलाने ऐकावं असं पालकांना वाटत असते, परंतु ते हे विसरून जातात कि, मुलं आपल्या भोवती विशेषतः घरात जे पाहतात तेच ते करतात. आपण केलेल्या कृतीच अनुकरण मुले करतात. पालक हे विसरून जातात कि, प्रत्येक मुलं हे स्वतंत्र आहे, प्रत्येकाला समजून सांगण्याची पद्धती समान सारखी असू शकत नाही, तसेच मुलांना सतत सुचनांचा कंटाळा येतो. मुलं अनुकरणप्रिय असतात, मोठ्या लोकांचे वागणे, बोलणे, कृती यांचे ते अनुकरण करतात. कित्येक पालक हे ऑफिस मधून घरी आल्यानंतर #मोबाईल मध्ये किंवा टीव्ही समोर तासंतास वेळ घालवतात. मित्रांसोबत फोनेवरती मुलांसमोर तासंतास गप्पा मारतात. तेच मुलं पाहतात आणि तसेच अनुकरण करतात. एकदा का मोबाइलचं व्यसन लागलं कि, मंग मुलं सतत मोबाइलचा अट्टाहास करतात. काही पालक आपल्या मुलांना पुरेसा वेळ देत नाही त्यामुळे एकलकोंडी मुले मोबाइलच्या आहारी जातात. फ्लॅट संस्कृती मध्ये त्यांना मित्र कमी असल्याने, आजुनबाजूला खेळण्याचे मैदान यांची कमतरता आणि त्यात आई आणि वडील दोघे नोकरदार यातून मुले अस्वस्थ होतात व मोबाइलचा आधार घेतात. त्यातील कार्टून, गेम्स त्यांना आवडू लागतात. मुलाने आपले ऐकावे असे वाटत असेल तर घरामध्ये पालकांनी तशी कृती करायला हवी, मुलांना पुरेसा वेळ द्यायला हवा. आपण कुठे कमी पडतोय याचे आत्म परीक्षण करावे. मुलांसमोर व्यसन करू नये, सकाळी मुलांना थोडाफार #व्यायाम करण्यासाठी मैदानावर न्यावे. आपण स्वतः #पुस्तके वाचावीत म्हणजे मुलांना वाचनाची आवड निर्माण होईल. मुलाला सांगतात त्याच्या विपरीत पालकच जर वर्तन करत असतील तर मुलं ऐकणारच नाहीत. या विषयी तुकाराम महाराज लिहितात.

शुद्ध बीजापोटी ! फळे रसाळ गोमटी !!
मुखी अमृताची वाणी ! देह देवाचे कारणी !!

लेखक - कृष्णा 
(संज्ञापन तथा पत्रकारितेचे पदवीधर )


Comments