Posts

Showing posts with the label marriage system

विवाहांतर

Image
    विवाह क्षण   प्रेमाचा, क्षण स्वप्न पुरतीचा, क्षण आनंदाचा, क्षण एकोप्याचा, क्षण उत्सवाचा. मानवसमाज गेल्या कित्येक पिढ्या, युगे विवाह हि संस्था जगत आला आहे, भोगत आला आहे. विवाह नावाची संस्था मानवी इतिहासात खोलवर रुजलेली आहे. कालांतराने आवश्यक ते बदल विवाह संस्थेत झालेले आहेत. विवाह संस्थेचा नेमका उगम कधी झाला हे सांगणे कठीण आहे परंतु बहुधा कुटुंबे किंवा जमातीमधील सामाजिक आणि आर्थिक बंध प्रस्थापित करण्याचा एक मार्ग विवाह संस्था म्हणून उदयास आली असावी असे काही संशोधकांचे मत आहे. विवाह संस्थेत वेळोवेळी बदल होत आले आहेत, कुटुंबातील साध्या करारापासून ते विधी आणि धार्मिक प्रथा यांचा त्यात समावेश आहे. प्राचीन ग्रीस मध्ये, विवाह हि नागरी बाब मानली जात होत होती, परंतु वर - वधूला आशीर्वाद देण्यासाठी धार्मिक समारंभ देखील आयोजित केले जात होते. प्राचीन रोम मध्ये, विवाह हा कायदेशीर करार   होता ज्यामध्ये विविध विधींचा समावेश होता . मध्ययुगीन काळात विवाहाला संस्कार म्हणून परिभाषित करण्यात कॅथॉलिक चर्च ने आणि भारतात पुरोहितांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली. काही विचारवंतांच...