पुणे तिथे काय उणे
महाराष्ट्राची आन , बाण आणि शान , महाराष्ट्रातील गार , हिरवे , गालिचे , महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील हिरवे , निळे , तांबडे , शहर म्हणजे ' पुणे ' शहर. ' पुणे तिथे काय उणे ', " पूर्वेचे ऑक्सफर्ड" गडकिल्ल्यांचे शहर 'शिक्षणाचे माहेरघर' असे अनेक विशेषणे या शहराला मिळालेली आहेत. सध्याच्या घडीला मॅनुफॅक्चरिंग तसेच आय टी हब म्हणून हे शहर उदयास आले आहे. पण तेव्हढ्याच किंबहुना त्याहून जास्त जोमाने महाराष्ट्राची संस्कृती इथे जपली जाते. हे शहर पश्चिम भारतातील दख्खनच्या पठारावर वसलेले गजबजलेले शहर आहे जिथे इतिहास , संस्कृती , शिक्षण आणि उद्योग एकसंधपणे एकत्र नांदतात. याला अनेक वेळा "भारतातील सर्वात राहण्यायोग्य शहर" म्हणून स्थान देण्यात आले आहे. 1818 ते 1978 पर्यंत या शहराचे अधिकृत नाव हे ' पूना ' असे होते. या शहराचा सर्वात जुना उल्लेख इ.स. 937 चा आहे , जेव्हा ते पुण्य-विषम म्हणून ओळखले जात असे. शतकानुशतके , त्याचे वैविध्यपूर्ण ऐतिहासिक प्रभाव प्रतिबिंबित करून त्याला वेगवेगळी नावे दिली गेली. पुननाका ते पुण्यपूर , पुनकविषयापासून पुण्यविषय...