मारा दांडी किंवा घ्या सुट्टी पण जरूर फिरून या
मारा दांडी किंवा घ्या सुट्टी पण जरूर फिरून या























भिमाशंकर ऍग्रो टुरिझम अँड रिव्हर कॅम्प, कुशिरे बु। (भीमाशंकर,) पुणे जिल्ह्यातील एक आल्हाददायक, थंड, नैसर्गिक वैविध्याने परिपूर्ण रमणीय सुंदर ठिकाण. हे ठिकाण सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत असून अतिशय घनदाट अरण्याने वेढलेले आहे. असं म्हणतात मानवी समाज हा पूर्वी भटकंती करून आपल्या गरजा भागवायचा.
अशा भटकंती मुळे किंवा प्रवासामुळे तणाव तर दूर होतोच शिवाय तुमच्या ज्ञानात देखील भर पडते,नवीन कल्पना सुचतात, फिरण्यामुळे खवय्या लोकांना वेगवेगळ्या स्वादिष्ट पदार्थांची मेजवानी मिळते. जर तुम्ही गेल्या काही दिवसांपासून कोरोना मुळे कुठे फिरायला गेला नसाल किंवा कामाच्या व्यापामुळे निसर्गापासून दूर गेले असाल तर अशा ठिकाणी जरूर भेट द्या जिथे गेल्यावर तुम्हाला ताजेतवाने वाटेल. त्यापैकीच एक ठिकाण म्हणजे कुशिरे बु। येथील भिमाशंकर ऍग्रो टुरिझम अँड रिव्हर कॅम्प. येथे तुमच्या राहण्याची, खाण्याची,अंघोळीची सर्व सुविधांची काटेकोरपणे काळजी घेतल्या जाते.
तुमच्या मुक्कामाची व्यवस्था करण्यासाठी सर्व सुविधांनी सज्ज प्रशस्त बिल्डिंग तयार आहेनदीकिनारी खेळण्यासाठी वेग वेगळे खेळ जसे कि, कॅरम, चेस तसेच पाण्यातील होडी, स्विमिंग किट्स उपलब्ध आहेत. येथे तुम्ही भीमा नदीच्या भल्यामोठ्या पात्रामध्ये अमर्यादित नौकाविहार करू शकता, छोट्या छोट्या होड्यातून नदीमध्ये मनसोक्त फिरू शकता. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी तुम्ही लांब ट्रेकिंग करू शकता इथल्या हिरव्यागार डोंगरनांमध्ये बागडू शकता आणि निसर्गाच्या कुशीत बसून त्याच्या सौंदर्याचे कौतुक देखील करू शकता. इथे फिरण्यासाठी जागांची कमी नाही. नवीन लग्न झालेली जोडपी, मोठ्या फॅमिलीज, कॉलेज ग्रुप्स, कंपनी ग्रुप्स, कट्ट्यावरचे मित्र मैत्रिणी साठी हे निसर्गरम्य ठिकाण अतिशय माफक दरात सर्व सुख सुविधा पुरवते. या ठिकणावरून वाहणारी भीमा नदी व तिच्या काठावरील सुंदर अशा डोंगरमाळा आपल्याला यथोच्च आनंद देतात.
कुशिरे बुद्रुक हे गाव आपल्या पुणे जिल्ह्यात आंबेगाव तालुक्यात निसर्गाच्या कुशीत भीमा नदी किनारी वसलेले आहे. या ठिकाणी तुम्हाला निसर्गाचे खरे सौंदर्य पाहायला मिळेल, येथील नदि, धबधबा, मैदाने, तिथली थंड हवा आणि तिथली लोक आपल्याला नक्कीच आपल्या रोजच्या ताणतणावातून मुक्त करतात तसेच आपल्याला निसर्गाशी एकरूप करतात. येथील माती तपकिरी आहे तिला छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा वारसा आहे तसेच ती महादेवाच्या भक्तिरसाने पवित्र झालेली आहे.या मनमोहक डोंगराळ भागात तापमान तुलनात्मक द्रुष्ट्या कमी आढळते,जून ते सप्टेंबर या कालखंडात नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून ३०० व ४०० सें. मी. पर्यंत पाऊस पडतो त्यामुळे पावसाळ्यात या भागात रानडुक्कर, सांबर, भेकर, रानमांजर, रानससा बिबट्या वाघ, सोनेरी लांडगा, कोल्हा, काळवीट, मुंगीखाऊ, तरस, वानर, हरीण, पिसोरी हरीण, उंदीर अशा प्रकारच्या विविध जातींच्या प्राण्यांचे दर्शन आपणास होऊ शकते.
महाराष्ट्राच्या मानचिन्हांपैकी एक म्हणजेच महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी ” शेकरू ” यालाही या जंगलात सुखाने बागडतांना आपल्याला पाहता येईल आणि विशेष गोस्ट म्हणजे शेकरू हा प्राणी तांबूस रंगाचा असून तो फक्त याच जंगलात आढळतो. इथे मोर, दयाळ, पोपट, कोकीळ, तांबट घुबड, खाटीक, चंडोल, रान कोंबडी, धनेश, ससाणा, घार आणि गरुड इत्यादी पक्षी गुण्या गोविंदाने नांदतात. रोजच्या दैनंदिन ट्राफिक पेक्षा या पक्षांचा आवाज आपल्याला नक्कीच स्वर्गीय आनंद देतो. या जंगलात आंबा, जांभूळ, उंबर, अंजन, साग, मोह, बांबू, हिरडा, करवंदे, पिसा, आईन अशा वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती आढळतात.जंगली वनस्पतींच्या बऱ्याचशा प्रजाती या जंगलात पाहायला मिळतात. त्याबरोबरच अनेक दुर्मिळ औषधी वनस्पती आहेत. इथे पावसाळा जसा मोहून टाकणारा असतो तसेच वर्षातील बराचसा काळ कोरडा परंतू थंड हवेने भरलेला असतो असे म्हणता येईल. हिवाळ्यात इथे गुलाबी थंडीचा अनुभव घेता येतो कारण तापमान ६डिग्री सें. पर्यंत कमी असते.उन्हाळ्यात तुलनात्मक द्रुष्ट्या हवामान उष्ण असते. या भागात बाजरी, तांदूळ प्रमुख खरीप पिके तसेच गहू व हरभरा हि प्रमुख रब्बी पिके घेतली जातात. ज्वारीचे पीक या भागात दोन्ही हंगामात घेतले जाते. या भागाला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झालेले आहे कारण भिमाशंकर ऍग्रो टुरिझम अँड रिव्हर कॅम्प पासून केवळ ५० मिनिटांच्या अंतरावरती बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे असे " भीमाशंकर" महादेवाचे पवित्र मंदिर आहे.हेमाडपंती पद्धतीचे हे मंदिर सुमारे १२०० ते १४०० वर्षांपूवीचे आहे.मंदिरात सुंदर नक्षीकाम आढळते. मंदिरावर दशावताराच्या कोरलेल्या सुंदर व रेखीव मूर्ती आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज येथे भीमाशंकराच्या दर्शनास येत असत तसंच पेशवे बाळाजी विश्वनाथ हे देखील येथे दर्शनासाठी आल्याच्या नोंदी आहेत. या मंदिराचे दर्शन घेऊन आपण केवळ ५० मिनिटात आपल्या कॅम्प ला जॉईन होऊ शकतो हे विशेष आहे.
हे ठिकाण निसर्गसौंदर्याने नटलेले आहे. जंगलाची सफर, हृदय स्पर्शी नदी किनारा, अस्सल गावाकडची oxygen वाली हवा आणि मासे खाण्याची मज्जा जर कुठे येत असेल तर "भिमाशंकर ऍग्रो टुरिझम अँड रिव्हर कॅम्प" मध्ये. येथे दरवर्षी हजारो पर्यटक येथे भेट देतात. चला तर मंग उचला बॅग आणि निघूया भिमाशंकर ऍग्रो टुरिझम अँड रिव्हर कॅम्प ला भेट द्यायला.
अधिक माहितीसाठी आम्हाला खालील पत्यावर्ती संपर्क करा



www. bhimashankar-agro-tourism-and-river-camp.business.site








Comments
Post a Comment