Posts

Showing posts with the label Thalassemia

थॅलेसेमिया : रक्तदान, जागरूकता आणि काळजी

Image
  मागील आठवड्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये " हौशी लोक " या विद्यापीठातील नॉन प्रॉफिट ग्रुपच्या वर्षपूर्ती निमित्त्य हौशी लोक तसेच दि विशींग फॅक्टरी ( एनजीओ ) आणि ससून हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . दि विशींग फॅक्टरी हि एनजीओ , थॅलेसेमिया मेजर आणि ब्लड कॅन्सर रुग्णांसाठी काम करते तर हौशी लोक हा, कलाकार तसेच विविध कलात्मक गोष्टीची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांचा पुणे विद्यापीठातील ग्रुप आहे . मी विद्यापीठात दुपारी जेवायला गेलो असतांना मला रक्तदान शिबिराविषयी समजलं व मी रक्तदान करायचं ठरवलं . माझी रक्तदानाची प्रक्रिया पूर्ण होत असतांना एक मुलगी माझ्या जवळ आली आणि तिने मला त्या रक्तदान शिबिराचा उद्देश थॅलेसेमिया असणाऱ्या रुग्णांसाठी रक्त जमा करणे हा आहे असे सांगितले . तिने मला थोडक्यात थॅलेसेमिया काय आहे व तो कुणाला होतो या बद्दल सांगितले . तो पर्यंत मला थॅलेसेमिया असा काही रोग असतो हे सुद्धा माहित नव्हते . तिने...