खेड्यातला नवरा नको ग बाई वर्तमानपत्रात प्रकाशित झालेला “ *शेतकरी नवरा नको ग बाई* ”हा लेख वाचला. त्यातील काही मुद्दे बरोबर आहेत जसे कि स्त्री भ्रूण हत्येची काळी सावली आणि **फसवणुकीच्या रॅकेट्स**पण त्यातील काही मुद्दे हे वास्तवाला धरून नाहीत असे वाटले म्हणून हा प्रपंच. मी ठामपणे सांगू इच्छितो की सध्या समाजात जे मुद्दे वारंवार मांडले जात आहेत, ते प्रत्यक्ष वास्तवाशी पूर्णपणे जुळत नाहीत. त्यामुळे या विषयाकडे थोड्या वेगळ्या दृष्टीकोनातून पाहण्याची गरज आहे. सर्वप्रथम, लेखात असे नमूद केले आहे की १० एकर शेती असलेल्या मुलाला मुली नाकारतात आणि १०-१२ हजार पगार असलेल्या शहरातील मुलाला पसंती देतात. परंतु शेती करणारा मुलगा “मालक” असतो आणि त्याच्या हातात सर्व निर्णय असतात असे म्हटले आहे. परंतु वास्तवात परिस्थिती इतकी सोपी नाही. आजचा शेतकरी पूर्णपणे स्वतंत्र निर्णय घेऊ शकतो ही कल्पना मोठ्या प्रमाणात चुकीची आहे. हवामान, बाजारभाव, कर्जव्यवस्था, सरकारी धोरणे आणि सामाजिक दबाव यामुळे त्याच्या आयुष्यावर अनेक बंधने असतात. त्यामुळे “मालक” ही संकल...