यशराज डिंबळे : मराठी चित्रपटसृष्टीतील एक उगवता प्रतिभावान खलनायक वजा नायक

 

यशराज डिंबळे : मराठी चित्रपटसृष्टीतील एक उगवता प्रतिभावान खलनायक वजा नायक

 

मराठी चित्रपटसृष्टीत नवीन अभिनेत्यांची लाट येत आहे परंतु अभिनयाची रेखीव जाण असणारे दुर्लभच  आणि त्यापैकी एक नाव  म्हणजे “यशराज डिंबळे. ”



३ मार्च २०२३ म्हणजेच काही दिवसापूर्वीच "रौंदळ" हा मराठी सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रभर धुमधडाक्यात प्रदर्शित झाला. कोरोना नंतर आलेली लोकांमधील मरगळ कमी झाली आणि लोकांचे पाय सिनेमा थिएटरकडे वळाले. बघता - बघता प्रेक्षकांची प्रशंसा मिळू लागली. या चित्रपटातील अनेक कलाकारांपैकी एक खलनायकी पात्र म्हणजे बिट्टू शेठ प्रसिद्धीस पावले. आणि हि बिट्टू शेठ ची खलनायकी व्यक्तिरेखा पडद्यावर जिवंत करणारा तरुण म्हणजे यशराज डिंबळे .”

"रौंदळ" या मराठी चित्रपटातील त्याच्या उल्लेखनीय कामगिरीने त्याला समीक्षकांची खानदानी  प्रशंसा मिळवून दिली आहे आणि चित्रपट प्रदर्शित होऊन दोन ते तीन आठवड्यांचा कालावधी झाला असला तरी त्याने साकारलेले "बिट्टू शेठ" हे पात्र लोकांच्या ध्यानामनातून मात्र खाली उतरत नाहीये.

त्याच्या  व्यक्तिरेखेने प्रेक्षकांना थक्क केले आहे. त्याने आपल्या निर्दोष कामगिरीने आपल्या व्यक्तिरेखेला जिवंत केले आहे. गावरान मराठी माणसाच्या हृदयाला हात घालणारा तंतोतंत आणि अचूकतेसह भाव भावनांचा  विस्तृत खेळ त्याला जमला आहे. समाजाच्या वास्तवामध्ये आपल्या भोवती असे कितीतरी बिट्टू शेठ आपल्याला दिसतात आणि अगदी तंतोतंतपणे त्याने त्या सामाजिक सत्य असणाऱ्या मानवी मनातील इर्षा पडद्यावर जिवंत केल्या आहेत.  त्याच्या डायलॉग डिलिव्हरीपासून ते त्याच्या दोन वाक्यातील घेतल्या गेलेल्या मिनी पॉज पर्यंत  त्याचे कौशल्य आणि अभिनयातील चार रस हास्यरासा अडून  रौद्र,बीभत्स आणि भयानक यांचा सुरेख संगम त्याने साधला आहे.

"रौंदळ "  या मराठी सिनेमात सर्वच कलाकारांनी जरी उत्कृष्ट अभिनय केला असला तरी यशराजला वेगळे ठरवणारी गोष्ट म्हणजे त्याचे त्याच्या कलाकुसरीचे समर्पण. त्याच्या अभिनयातील बारकावे आणि प्रेक्षकांना त्यांच्या मोरंजनाची भरपूर मेजवानी मिळावी म्हणून त्याने घेतलेली प्रचंड मेहनत प्रत्येक क्षणी पडद्यावर सर्वांचे लक्ष त्याच्याकडे खेचून घेते. त्याची कलेशी असलेली इमानदार  बांधिलकी प्रत्येक दृश्यात दिसून येते. म्हणूनच कि काय प्रेक्षकांना त्याच्या अभिनयाची पडलेली भुरळ हे कलेशी त्याच्या वचनबद्धतेचा पुरावा आहे.

"रौंदळ "  हा एक उत्कृष्ट सिनेमा ठरला आहे यात कुणाचेच दुमत असणार नाही. या सिनेमामध्ये मानवी मानसिकता, लोभ, क्रोध, मद, मत्सर आणि त्यावर मानवतेचा, प्रेमाचा, सत्याचा विजय याची बाज दिग्दर्शकाला चांगली विणता आली आहे. आणि त्यातून  प्रत्येक व्यक्तिरेखेच्या उलगडत जाणाऱ्या गुंतागुंतीच्या भावना सहजतेने व्यक्त करण्याच्या  दिग्दर्शकाच्या क्षमतेची प्रशंसा केली पाहिजे.  महाभारताच्या रणांगणात एकदा श्री कृष्णाने अर्जुनाला सांगितलेले होते कि, प्रत्येक वेळी बदला घेणे हे काही योग्य नसते परंतु काही वेळा बदला न घेणे हेही काही योग्य नसते. याच उपदेशाची या चित्रपटात अंमलबजावणी आपल्याला पाहायला मिळते.

 



मराठी सिनेमा जसजसा वाढत आहे आणि विकसित होत आहे, तसतसे यशराजसारख्या उजव्या कलाकारांना त्याची अंगभूत असणारी प्रतिभा चमकावण्याची  संधी मिळत आहे. यशराजचे अभिनय कौशल्य आणि त्याच्या कलेबद्दलचे समर्पण त्याला आगामी काळात मराठी चित्रपटसृष्टीतील एक उगवता तारा बनवेल यात मला तरी काही शंका नाही. आगामी वर्षांमध्ये त्याच्या अस्सल खानदानी अभिनयाचा वाढत जाणारा फुलोरा पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. यशराजला पुढील वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा !!!

                                                                                                                         लेखक - कृष्णा दाभोलकर

                                                                                                                              (संज्ञापन तथा पत्रकारिता पदवीधर)

Comments