“इस्कॉन" इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा चेतना

भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्याद्वारे स्थापित "इस्कॉन" म्हणजेच इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा चेतना हि १९६६ मध्ये न्यूयॉर्क शहरात स्थापना झालेली संस्था सामान्यत: हरे कृष्ण चळवळ नावाने ओळखली जाते. हि एक जगभर पसरलेली गौडीय वैष्णव हिंदू धार्मिक संस्था आहे. इस्कॉन ही गौडीय वैष्णव परंपरेची सर्वात मोठी आणि सर्वात महत्त्वाची अध्यात्मिक शाखा आहे. वैष्णव धर्म म्हणजे "विष्णूची उपासना" आणि गौड म्हणजे पश्चिम बंगाल आणि बांगलादेशातील गौडा प्रदेशात उगम झालेली संस्था. या चळवळीचे पुढील नामांतर म्हणजे इस्कॉन. गौडीय वैष्णव हिंदू धार्मिक संस्थेचे भारतात 16 व्या शतकाच्या सुरुवातीपासून अनुयायी असल्याचे पुरावे आहेत तसेच 1900 च्या दशकाच्या सुरुवातीपासून अमेरिकन आणि युरोपियन प्रदेशामध्ये अनेक अनुयायी तयार झाल्याच्या नोंदी आहेत. सध्याच्या घडीला इस्कॉन ही जगभरातील सर्वात प्रमुख आणि प्रभावशाली आध्यात्मिक चळवळींपैकी एक बनली आहे. 1966 मध्ये भक्तिवेदांत स्वामी श्रीला प्रभुपादांनी भगवान श्रीकृष्णाचे अध्यात्मिक ज्ञान आणि प्राचीन वैदिक ज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने भारत ते युनायटेड ...