माइंड युअर लँग्वेज

माइंड युअर लँग्वेज मराठी भाषेमध्ये एक सुविचार आहे 'शब्द हे शस्त्र आहे ते जपून वापरा'. समर्थ रामदास म्हणतात , शब्द आणि शस्त्र या दोन्ही शब्दांमध्ये पहिला "श" समान आहे. कारण , शस्त्राच्या घावानं माणूस एकदाच मरतो आणि शब्दाच्या घावानं रोज मरत राहतो. संत ज्ञानेश्वर म्हणतात , ज्ञान देणारा शब्द तरंगांपेक्षा शक्तिशाली आहे , संत तुकाराम महाराज म्हणतात , आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने | शब्दांचीच शस्त्रे यत्न करू | शब्दे वाटू धन जनलोका | तुका म्हणे पाहा शब्दची हा देव | शब्देची गौरव पूजा करू I जुन्या हिंदी चित्रपटात "माइंड युअर लँग्वेज मिस्टर" असा डायलॉग आपण अभिनेत्री म्हणतांना पाहिला असेलच , असा शब्दांचा महिमा थोर आहे. त्यामुळेच कि काय आता सर्वोच्च न्यायालयाने "माइंड युअर लँग्वेज" असे सर्वांना म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने लिंगसामानतेच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल टाकतांना लिंगभेद दर्शविणाऱ्या काही प्रचलित शब्दांना पर्यायी शब्द देऊन मागच्या आठवड्यात म्हणजे बुधवारी दिनांक १६ ऑगस्ट रोजी एक हस्तपुस्तिका प्रसिद्...