ज्यांची बाग फुलून आली
विषमता ही एक अशी गोस्ट आहे ज्याचा संबंध सरळ सरळ आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनाशी असतो. तो आपल्याला सकाळी उठल्यापासून ते कामावरून परत येऊन झोपे पर्यंत जाणवतो. तो आपल्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि पर्यायाने व्यवहारिक जीवनावर परिणाम करतो. नवउदारवादी धोरणांचा स्वीकार केल्यानंतरच्या काळात विषमता वाढीस अनेक पातळीवरून प्रोत्साहनच मिळतांना दिसत आहे. पूर्वी विषमता गरिबी आणि श्रीमंती याच भोवती ठळक दिसायची पण आता विषमतेची व्याप्ती वाढत जाऊन ती आपल्या जीवनावरती तीक्ष्ण परिणाम करतांना दिसतेय. म्हणजे बघा असं कि, आपल्याला सरकारी नोकरदार आणि खाजगी नोकरदार यांच्यातील आजच्या घडीचा टोकाचा फरक हे एक बदलत चाललेल्या विषमतेच लक्षण आहे. यात अजून सूक्ष्मआर्थिक भेदभाव बघायचा झाला तर नियमित म्हणजे पर्मनन्ट सरकारी नोकरदार आणि कंत्राटी नोकरदार याची प्रति बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदललेला दिसतोय. मेट्रोसिटी जसे कि पुणे, मुंबई येथे ज्याचा स्वतःचा फ्लॅट घर आहे आणि जो भाडेतत्वावर राहतो या दोघांकडे समाजाचा बघण्याचा दृष्टीकोन बदललेला आहे . आजकाल तर...