तो अतिसार आहे कि आमांश आहे

आला पावसाळा तब्येत सांभाळा अशा सूचना आपण दर पावसाळ्यात वर्तमानपत्रातून , वृत्तवाहिन्यांवरून आणि आजकाल सोशिअल मीडिया वरून नक्की ऐकतो . पावसाळ्यात वेगवेगळ्या साथीचे संसर्गात्मक रोग , आजार प्रदूषित वातावरातून , पाण्यातून पसरतात त्यापैकी एक मुख्य आजार म्हणजे जुलाब लागणे किंवा हगवण लागणे . आपण गावाखेड्यात किंवा अगदी शहरात सुद्धा लोकांच्या तोंडून ऐकतो कि मला जुलाब झाला आहे किंवा मला लूज मोशन होत आहे . पण हे हगवण लागणे किंवा जुलाब लागणे किंवा लूज मोशन होणे नेमके आहे तरी काय हे जाणून घेऊया . हगवण लागणे किंवा जुलाब लागणे याचे मुख्यतः दोन प्रकारात वर्गीकरण करता येते . पहिला प्रकार म्हणजे “ अतिसार” (Diarrhea) आणि दुसरा प्रकार म्हणजे “ आमांश” (Dysentery). अतिसार म्हणजे हि एक अशी स्थिती आहे यात व्यक्तीला मलवृत्ती होते . मल पातळ होण्याचे प्रमाण वाढते आणि दिवसातून अनेकवेळा सौचास जावे लागते . अतिसार हा मुख्यतः दूषित पाण्यामुळे , अस्वच्छ आहार घेतल्यामुळे होतो . पण तो कध...