Posts

Showing posts from December, 2022

शुद्ध बीजापोटी !

Image
आजकाल आपल्याला प्रत्येक पालकांकडून असा सुरु ऐकायला मिळतो कि, माझा मुलगा / मुलगी माझे ऐकत नाही, तो / ती सतत मोबाइलवर टाइमपास करत असतात. वेळेत अभ्यास करत नाहीत. सकाळी लवकर उठत नाही, उद्धटपणे उत्तर देतात. आई - वडील कित्येक वेळा मुलांच्या हातातून मोबाईल हिसकावून घेतात, पण थोड्यावेळाने मुलं आई वडिलांची नजर चुकवून परत मोबाईल हातात घेतात. बऱ्याच आई - वडिलांसमोर मुले सतत टीव्ही, कॉम्पुटर, किंवा मोबाइलवर व्यस्त असतात ही खूप मोठी समस्या आहे. त्यांनी कित्येक वेळा रागावून, समजून सांगूनही आपलंच मुलं आपलं ऐकत नाहीत याच त्यांना दुःख असत. मी सांगितलेलं माझ्या मुलाने ऐकावं असं पालकांना वाटत असते, परंतु ते हे विसरून जातात कि, मुलं आपल्या भोवती विशेषतः घरात जे पाहतात तेच ते करतात. आपण केलेल्या कृतीच अनुकरण मुले करतात. पालक हे विसरून जातात कि, प्रत्येक मुलं हे स्वतंत्र आहे, प्रत्येकाला समजून सांगण्याची पद्धती समान सारखी असू शकत नाही, तसेच मुलांना सतत सुचनांचा कंटाळा येतो. मुलं अनुकरणप्रिय असतात, मोठ्या लोकांचे वागणे, बोलणे, कृती यांचे ते अनुकरण करतात. कित्येक पालक हे ऑफिस मधून घरी आल्यानंतर #मोबाईल मध्...